Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

सिल्व्हर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला वार्षिक शैक्षणिक सहलीचा मनसोक्त आनंद!

सिल्व्हर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला वार्षिक शैक्षणिक सहलीचा मनसोक्त आनंद!

       संगमनेर ( युवा ध्येय) शाळेची सहल म्हणजे प्रवासाचे नियोजन,निवास, माफक खर्च, मनोरंजनाचे पर्याय, समुद्रकिनारे, ऐतिहासिक स्थळे, वन्यजीव किंवा सांस्कृतिक ठिकाण यांचा समावेश. विद्यार्थ्यांचा आनंद तसेच वेगवेगळ्या ठिकाणांची माहिती यांची दखल घेण्याचे काम शाळा नेहमीच करते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर आणि संचालिका सोनल बिन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या वार्षिक शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले .सहलीचा मनमुराद आनंद सिल्व्हर लोटस स्कूलच्या विद्यार्थ्यांनी घेतला.

सर्वप्रथम बालगटानी म्हणजेच ज्युनियर के.जी आणि सीनियर के.जी यांनी श्रीफळ फोडून सहलीची सुरुवात केली. सिन्नर मधील *वारकरी भवन, गोंदेश्वर मंदिर व ऐश्वर्य मंदिर* या हेमांडपंथी वास्तुकलेचे विद्यार्थ्यांनी दर्शन घेतले. मंदिराची माहिती तसेच वेगवेगळे खेळ, देवाचे महात्म्य, विद्यार्थ्यांची मजा व आनंद या सहली दरम्यान घेतला. तसेच इयत्ता पहिली ते इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांची सहल शुभम एडवेंचर पार्क नाशिक, स्वामीनारायण मंदिर नाशिक येथे नेण्यात आली.

विद्यार्थ्यांनी सहली दरम्यान अविस्मरणीय अनुभव घेतले. स्वामीनारायण मंदिराचे दर्शन घेऊन मंदिरा विषयी माहिती जाणून घेतली.वेगवेगळे एडवेंचर गेम खेळण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला, पण खास लक्ष वेधून घेतले,ते म्हणजेच तेथील मॅजिक शो ने.कारण मॅजिक शो मधील हाताची सफाई ही विद्यार्थ्यांसाठी एक गुढच होते.तसेच यानंतर इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावीची सहल निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेले ठिकाण म्हणजेच कोकण या ठिकाणी नेण्यात आली.

कोकण दौऱ्यामध्ये पालीचा गणपती, काशीद बीच, जंजिरा , मुरुड बीच, दिवेआगर, हरी हरेश्वर मंदिर, महाड चवदार तळे अशा दोन दिवसीय सहलीचा विद्यार्थी व शिक्षक यांनी अविस्मरणीय आनंद घेतला. निखळ पाण्यातील मज्जा, जंजिराचा इतिहास, बल्लाळची भक्ती अशा अनेक गोष्टींचा अनुभव हा विद्यार्थ्यांनी घेतला.

सहलीचा विद्यार्थ्यांनी तसेच सर्व शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांनी मनमुराद आनंद लुटला. सदर सहली यशस्वी होण्यासाठी सर्व पदाधिकारी तसेच शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले .

Leave a comment