Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

अहिल्यानगर जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार

चंद्रशेखर घुले : अध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार

अहिल्यानगर जिल्हा बँक सोनेतारण व्यवसाय वाढवणार

चंद्रशेखर घुले : अध्यक्षपदी निवडीबद्दल सत्कार

अहिल्यनगर युवा ध्येय

अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोनेतारण व्यवसायात वाढ करणार आहे. त्या दृष्टीने बँकेचा सेवक हा प्रशिक्षित होणे गरजेचे आहे. बँकेचे सोने तारण कर्जावरील व्याजदर इतर बँकांच्या तुलनेत कमी असून आता सेवकांनी चांगले काम होईल या दृष्टीने कामकाज व्हावे, असे मत अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांनी व्यक्त केले.

जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल चंद्रशेखर घुले यांचा सत्कार करण्यात आला, तसेच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सभागृहामध्ये बँकेचे जिल्ह्यातील, तालुका विकास अधिकारी व शाखांतील सेवकांकरता सोने तपासणी व त्या संदर्भात आणि अडचणी संदर्भातील प्रशिक्षण झाले. यावेळी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

चंद्रशेखर घुले पाटील म्हणाले, की जिल्हा बँकेला मोठा इतिहास असून बँकेची परंपरा अतिशय उज्ज्वल आहे. तर बँकेने नेहमीच शेतकरी, ग्राहकांच्या आणि सभासदांच्या हिताच्या दृष्टीने कामकाज केले आहे. बँकेचे सेवक निश्चितपणे सोने तारण व्यवसाय वाढवतील असे वर्पे यांनी सांगितले.

Leave a comment