खिर्डी सोसायटीच्या चेअरमनपदी वसंत जोरवर यांची बिनविरोध निवड
नाशिक युवा ध्येय
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी खिर्डी (ता. नांदगाव जि.नाशिक) चेअरमनपदी वसंत कचरू जोरवर यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.विविध कार्यकारी सहकारी सोसायटी खिर्डी सोसायटीच्या चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे, नांदगाव तालुक्याचे ज्येष्ठ नेते बापूसाहेब कवडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती व कानडे समाजाचे जेष्ठ नेते एकनाथ पाटील सदगीर, टाकळी गावचे विक्रम गोडसे, कृषी उत्पन्न बाजार समिती नांदगावचे माजी संचालक नंदू खरात, खिर्डी सोसायटीचे माजी चेअरमन दिलीप पंढरीनाथ जोरवर व माजी चेअरमन कारभारी कचरू जोरवर, माजी चेअरमन बाबुराव पठाडे, शिवसेना शिंदे गट शाखाप्रमुख समाधान जोरवर, साहेबराव चौधरी, शांताराम चौधरी, साहेबराव जोरवर, सुदाम बेंडके, बारकु शिंगाडे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
विविध कार्यकारी सहकारी सोसायटी खिर्डी सोसायटीच्या संचालक मंडळातील उत्तम चौधरी, पुंडलिक चौधरी, त्रंबक पठाडे, विजय पठाडे, वसंत पठाडे, लक्ष्मण शिंगाडे, नंदू खरात, दिलीप जोरवर, बापू माळी, कविता शिंगाडे या सर्व संचालकांनी बिनविरोध निवडीसाठी पाठिंबा दिला. निवड प्रक्रियेत वसंत पठाडे, शांताराम जोरवर, नामदेव मते, संजय जोरवर, दत्तू खालकर, गौरख चौधरी, भाऊराव चौधरी, शिवाजी जोरवर, विक्रम जोरवर, नंदू पगारे, गोरख बागुल, किरण अहिरे, चिंधा बागुल, शशुपाल सदगीर, भाऊराव चवंडगीर, मच्छिंद्र चवंडगीर, संतोष चौधरी, शशी अहिरे, नंदू पठाडे, सदाशिव चौधरी, रवींद्र जोरवर फौजी, नारायण जोरवर, भाऊलाल चौधरी, गणेश चौधरी, संतोष मते, शिवसेना शाखाप्रमुख अशोक चौधरी, नाना करवर, विजय करवर, संपत जोरवर, रवींद्र जोरवर, संतोष बागुल, तुकाराम खरात, भाऊराव खरात, कौतिक खरात, गोविंद खालकर, पंडित मते, गजानन खरात, रामभाऊ चौधरी, ज्ञानेश्वर चौधरी, विकास टेकनर, दत्तु जोरवर यांचे सहकार्य लाभले.
