श्रीरामपुरात सपकाळ- गुजर गळाभेट
श्रीरामपूर युवा ध्येय
काँग्रेसचे अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर यांचे बुधवारी सकाळी अपहरण करून मारहाण करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज यांचा एकेरी उल्लेख केल्याच्या कारणातून हा हल्ला केल्याचा दावा केला जात आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सायंकाळी श्रीरामपूरला येऊन गुजर यांची भेट घेतली. गुजर यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तेथे जाऊन सपकाळ यांनी त्यांची गळाभेट घेतली.
या भेटीबद्दल सपकाळ यांनी म्हटले आहे, “गुजर यांची दवाखान्यात जावून भेट घेतली. भाजपच्या गुंडांना न घाबरल्याबद्दल त्यांना जादूची झप्पी दिली. त्यांना संविधान रक्षणाचा संकल्प बुलंद करण्यासाठी भारतीय राज्यघटनेचची प्रत दिली. तसेच गोविंद पानसरे यांचे शिवाजी कोण होता? हे पुस्तक भेट दिले.”
श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, नगराध्यक्षपदाचे उमेदवार करण ससाणे, माजी सभापती बाबासाहेब दिघे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुधीर नवले, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, पंचायत समितीचे माजी सभापती वंदनाताई मुरकुटे उपस्थित होते.
