Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये संविधान दिन उत्साहात साजरा

सिन्नर युवा ध्येय

 

भारतीय इतिहासातील सुवर्ण दिवस म्हणजेच ‘संविधान दिवस’ सिल्व्हर लोटस स्कूलमध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रत्येक भारतीय हा स्वतंत्र आहे याची आठवण करून देणारा हा दिवस आहे. याप्रसंगी स्वतंत्र भारताचे कायदे तज्ञ तसेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संविधान दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेच्या प्राचार्या मनीषा गुरुळे होत्या. सुरुवातीला डॉ.आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले. याप्रसंगी व्यासपीठावर उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे, मुख्याधिकारी कविता डावखर ,बालगटाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गोराडे, योग शिक्षक राजेंद्र नन्नावरे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक मयुरी दाभाडे यांनी केले. शाळेतील शिक्षिका रेवती कदम यांच्या सह शिक्षक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे पठण केले. यानंतर इयत्ता आठवीचा विद्यार्थी हर्षल राजपूत व सहावीतील विद्यार्थिनी प्रांजल सदगीर हिने संविधान दिनाचे महत्त्व सांगितले. तसेच इयत्ता दहावीचा विद्यार्थी सम्यक पठारे याने आपल्या दमदार आवाजात लोकशाही म्हणजे काय? तसेच एक भारतीय नागरिक म्हणून आपली जबाबदारी काय ? याचे महत्त्व पटवून दिले.

यानंतर बालगटाच्या मुख्याध्यापिका प्रतिभा गोराडे यांनी संविधान निर्मितीसाठी काय, कोणी व कसे अथक प्रयत्न केले? व तसेच संविधानाने भारताला काय दिले ?याची सखोल माहिती विद्यार्थ्यांना आपल्या भाषणातून दिली.

 

कार्यक्रमाच्या अध्यक्ष प्राचार्या मनीषा गुरुळे यांनी आपल्या भाषणात संविधान म्हणजे एखाद्या देशाचा किंवा संस्थेचा कारभार चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या मूलभूत नियमांचा आणि तत्त्वांचा एक संच आहे. हे कायदेशीर दस्तऐवज सरकारची रचना, अधिकार, कर्तव्ये आणि नागरिकांचे हक्क निश्चित करते. भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठे लिखित राष्ट्रीय संविधान आहे आणि ते मूलभूत राजकीय संहिता, सरकारी संस्थांची कर्तव्ये आणि नागरिकांची कर्तव्ये ठरवते. संविधानाची सखोल अशी माहिती विद्यार्थ्यांना सांगितली.

 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन स्नेहल घुले यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे बहुमूल्य असे सहकार्य लाभले.

Leave a comment