Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

डॉ. संजीवजी नाईक युवा प्रतिष्ठानकडून आरोग्य शिबिराचे आयोजन 

  • डॉ. संजीवजी नाईक युवा प्रतिष्ठानकडून आरोग्य शिबिराचे आयोजन 

 

पुणे युवा ध्येय 

 

पुण्यातील धनकवडी परिसरात भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे शहर उपाध्यक्ष मनोज (बाबाशेठ) नाईक यांच्या पुढाकाराने व डॉ. संजीवजी नाईक युवा प्रतिष्ठान आयोजित विविध सामाजिक कार्यक्रमांचा सोहळा उत्साहात संपन्न झाला. 

 

यावेळी रक्तदान महायज्ञ सोहळा, युवा, ज्येष्ठ नागरिक व महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबीर असे महत्त्वपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. तसेच परिसरातील उत्कृष्ट बचतगटांचा सत्कार समारंभ पार पडला. ज्यामुळे महिला बचतगटांना आपल्या कामासाठी अधिक प्रोत्साहन मिळाले. धनकवडीमधील कर्तबगार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘जय गणेश स्कॉलरशिप’चे वाटप देखील यावेळी करण्यात आले. ज्यामुळे त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला हातभार लागला. तसेच, जय शंकर भजनी मंडळ (धनकवडी) यांनी केलेल्या भजन सेवेमुळे कार्यक्रमाला धार्मिक आणि शांततामय वातावरण लाभले.

 

मनोज (बाबाशेठ) नाईक यांनी दाखवलेल्या सामाजिक बांधिलकीमुळे धनकवडीतील नागरिकांना आरोग्य, शिक्षण आणि सन्मान एकाच वेळी प्राप्त झाला. यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांचे आभार मानले. 

कार्यक्रमास प्रमुख उपस्थितीत वनमंत्री नामदार गणेशदादा नाईक, माजी खासदार डाॅ.संजीवजी नाईक, आमदार भिमराव तापकीर, नगरसेविका वर्षाताई तापकीर, माजी नगरसेविका मोहिनी देवकर, अरूण राजवाडे, माऊली पांचाळ, सत्यवान कामठे, अक्षय वरघडे, वसिम शेख, रणधीर गायकवाड, स्वप्निल म्हस्के, राहुल परदेशी, प्रशांत सामलेट्टी, दादा देवकर, प्रतिक सोनकांबळे, आबा दाभाडे, महेश नाईक, विक्रांत तापकीर, तेजस कुलकर्णी, श्रीकांत पाटील आदी मित्रपरिवार उपस्थित होता.

Leave a comment