Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

राहुरी कृषी विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन

राहुरी कृषी विद्यापीठात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास अभिवादन.

राहुरी विद्यापीठ युवा ध्येय

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे मुख्य प्रवेशद्वारा समोरील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास त्यांच्या १३५ व्या पुण्यतिथीनिमित्त पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी अभिवादन करताना महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव व्ही.टी. पाटील म्हणाले की, महात्मा फुले यांनी केलेले कार्य खूप मोठे असून त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवरील पहिला पोवाडा लिहिला. पुण्यामध्ये भिडे वाड्यात महिलांसाठी पहिली शाळा सुरू केली. अशा प्रकारे महिलांच्या शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून सर्वांना दिशादर्शक ठरेल असे काम केले. सहाय्यक कुलसचिव व विद्यापीठाचे सुरक्षा अधिकारी महेश घाडगे यांनी आभार व्यक्त केले. याप्रसंगी विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी तसेच सुरक्षा विभागातील लिपिक रविराज काळे, सुरक्षा पर्यवेक्षक डी. एन. जाधव, दत्तू अडसुरे, राहुल पवार, कल्याण मेटे, तुषार गिरगुणे वाहनचालक विष्णू गायकवाड, मिस्तरी श्री.औटी, सुरक्षारक्षक विश्वास बोर्डे, अक्षय परदेशी, अनिल नजन व रमेश थोरात उपस्थित होते.

Leave a comment