Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

विजय भोसले यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

विजय भोसले यांना सामाजिक कृतज्ञता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

 

राशीन ( युवा ध्येय) अहिल्यानगर येथील आदिवासी पारधी समाज विकास संस्था संचलित संकल्प वसतिगृहाच्या माध्यमातून विजय भोसले व प्रणिता भोसले हे दाम्पत्य गेली दहा वर्षांपासून गरीब निराधार ऊसतोड वंचित भटके आदिवासी पारधी समाजातील मुलांचे त्यांचे आरोग्य पाहत शिक्षण संगोपन करत आहे. कोणत्याही सरकारी अनुदानाशिवाय केवळ लोकसभागाद्वारे हे कार्य सुरू आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना वालचंदनगर माजी विद्यार्थी मंडळ, पुणे आणि इव्हो ग्रीन सिटी यांच्या तर्फे दिला जाणारा सामाजिक कृतज्ञता पुरस्कार जयंत पाटील, प्रकाश कुलकर्णी, डॉ. श्रीमंत कोकाटे आणि संदीप सोनिग्रा यांच्या हस्ते संकल्प वसतिगृहाचे संचालक विजय भोसले यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.

प्रमोद ठकार, गणेश कदम सर्व आयोजकांचे विजय भोसले यांनी आभार मानले.

Leave a comment