Ahilyanagar Times 24
Marathi Breaking News and Live Updates

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणारी संगमनेर महाविद्यालयाची अभिनव स्पर्धा – संगमनेर महाविद्यालयात सर्वाधिक वेळ वाचन स्पर्धा संपन्न.

विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करणारी संगमनेर महाविद्यालयाची अभिनव स्पर्धा – संगमनेर महाविद्यालयात सर्वाधिक वेळ वाचन स्पर्धा संपन्न.

संगमनेर ( युवा ध्येय) : विद्यार्थ्यांनी पुस्तकापासून प्रेरणा घ्यावी. नियमित अभ्यास करताना आपले लक्ष अभ्यासाबरोबर ग्रंथालयातील पुस्तकांच्या वाचनावर केंद्रित करावे. केवळ परीक्षार्थी न होता ज्ञानार्थी व्हावे. आभासी व्हॉटस अँप विद्यापीठातून बाहेर पडून महाविद्यालयाच्या ग्रंथालयात वाचन करावे असे मत ग्रंथालय विभाग आयोजित सर्वाधिक वेळ वाचन स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड यांनी व्यक्त केले. डॉ. एस.आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करुन या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमाच्या वेळी व्यासपीठावर ग्रंथालय समितीचे कार्याध्यक्ष उपप्राचार्य डॉ. रविंद्र ताशिलदार, भूगोल विभागाचे प्रमुख डॉ. रविंद्र गायकवाड,प्रभारी ग्रंथपाल प्रा.विशाल जाधव, विजय पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्राचार्य म्हणाले की, विद्यार्थ्यांनी वाचन करण्यासाठी प्रथमतः व्हॉटस अँप विद्यापीठातून बाहेर पडले पाहिजे. व्हॉटसअँप कधी व किती वेळ पाहावे याला सुध्दा मर्यादा आहेत. व्हॉटसअँप मधून बाहेर पडल्याशिवाय वाचनाची आवड निर्माण होणे शक्य नाही. विद्यार्थ्यांनी नेहमी वाचनाचा छंद जोपासावा. कारण त्याला वयाचेही बंधन नसते. वाचन संस्कृती टिकविण्यासाठी विद्यार्थ्यांनी अवांतर पुस्तके वाचावीत. पुस्तके हीच सर्वांगीण विकासाची माध्यमे आहेत. वाचनामुळेच विकसित व समृध्द समाज निर्मिती होते. विद्यार्थ्यांनी रोज कमीत कमी एक तास वाचन करावे असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिला.आपल्या महाविद्यालयाकडे सर्व ग्रंथ-संपदा उपलब्ध आहे. त्याचा फायदा विद्यार्थ्यांनी करून घ्यावा. आपण विद्यार्थ्याना नेहमीच केंद्रबिंदू मानून कार्य करत आहोत. असेही यावेळी बोलताना प्राचार्य प्रो.डॉ. अरुण गायकवाड म्हणाले.तसेच विद्यार्थ्यांना पुस्तकाशी थेट नाते जोडणारा संदेश दिला.
वाचन स्पर्धेचे आयोजन भूगोल विभागाच्या प्रात्यक्षिक हॉलमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेसाठी मराठी, हिंदी, इंग्लिश व संस्कृत या चार भाषेतील पुस्तके उपलब्ध करून देण्यात आली होती. सर्वाधिक वेळ वाचन स्पर्धेत छत्तीस विद्यार्थ्यांनी मोठया उत्साहाने सहभाग नोंदविला. त्यामध्ये प्रथम क्रमांक शेटे वैष्णवी सोन्याबापू (एफ.वाय.बी.एस्सी), द्वितीय पऱ्हाड स्मिता राजाबापू (टी.वाय.बी.एस्सी) व हासे दुर्गा अरुण ( टी.वाय.बी.ए.) तर तृतीय क्रमांक महाले ज्ञानश्री संजय व तायडे संकेत अमोल (एस.वाय.बी.ए.) यांनी पटकाविला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रभारी ग्रंथपाल प्रा. विशाल जाधव यांनी तर सूत्रसंचालन विजय पाटील यांनी केले. या वेळी प्रा. संदीप देशमुख, प्रा.विनोद गायकवाड,प्रा.बाबासाहेब कासार, प्रा.शलाका क्षत्रिय तसेच शिक्षकेतर सहकारी उपस्थित होते.

Leave a comment